RP-Events

Thursday, 26 February 2015

28th May 1883-26th February 1966 

  1. vinayak d savarkar साठी प्रतिमाप्रतिमांची तक्रार नोंदवा
    • vinayak d savarkar साठी प्रतिमा परिणाम
    •  
    • vinayak d savarkar साठी प्रतिमा परिणाम
    •  
    • vinayak d savarkar साठी प्रतिमा परिणाम
    •  
    • vinayak d savarkar साठी प्रतिमा परिणाम
    •  
    • vinayak d savarkar साठी प्रतिमा परिणाम
    •  
    • vinayak d savarkar साठी प्रतिमा परिणाम
    •  
    • vinayak d savarkar साठी प्रतिमा परिणाम
    vinayak d savarkar साठी अधिक प्रतिमा
  2. विनायक दामोदर सावरकर

    विकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेत[दाखवा]
    विनायक दामोदर सावरकर
    Vinayak damodar savarkar.jpg
    जन्म:मे २८, इ.स. १८८३
    भगूर, नाशिक जिल्हा, महाराष्ट्र, भारत
    मृत्यू:फेब्रुवारी २६, इ.स. १९६६
    दादर,मुंबई,महाराष्ट्र,भारत
    चळवळ:भारतीय स्वातंत्र्यलढा
    संघटना:अभिनव भारत
    अखिल भारतीय हिंदू महासभा
    धर्म:हिंदू
    वडील:दामोदर सावरकर
    आई:राधा सावरकर
    पत्नी:यमुनाबाई विनायक सावरकर
    स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (२८ मे, इ.स. १८८३:भगूर - २६ फेब्रुवारी, इ.स. १९६६) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी भाषेतील कवी व लेखक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका क्रांतिकारक चळवळीचे धुरीण, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तरभारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी, हिंदुसंघटक व हिंदुत्वाचे एक विशिष्ट तत्त्वज्ञान मांडणारे तत्त्वज्ञ, विज्ञानाचा पुरस्कार व जातिभेदाचा तीव्र विरोध करणारे समाज क्रांतिकारक, भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते, प्रतिभावंतसाहित्यिक आणि प्रचारक असे अनेक पैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला होते.
    त्यांना स्वातंत्र्यवीर अशी उपाधी प्रसिद्ध मराठी लेखक, पत्रकार, शिक्षक, चित्रपट दिग्दर्शक/निर्माते प्रल्हाद केशव अत्रे यांनी दिली.

    अनुक्रमणिका

       [लपवा] 
    • १ चरित्र
    • २ सावरकरांचे जात्युच्छेदन
      • २.१ एक माकड महासंमेलन आणि दुसरे भाकड महासंमेलन
      • २.२ सात बेड्या
    • ३ हिंदू महासभेचे कार्य
    • ४ संस्था
    • ५ सावरकर साहित्य
    • ६ पुरस्कार
      • ६.१ ग्रंथ आणि पुस्तके
      • ६.२ इतिहास
      • ६.३ कथा
      • ६.४ कादंबरी
      • ६.५ आत्मचरित्रपर
      • ६.६ हिंदुत्ववाद
      • ६.७ लेखसंग्रह
      • ६.८ नाटके
    • ७ स्वातंत्र्यवीर सावरकरांवर लिहिलेली पुस्तके आणि त्याचे प्रकाशक
    • ८ अधिक वाचन
    • ९ हेही पहा
    • १० संदर्भ
    • ११ बाह्य दुवे

    चरित्र[संपादन]

    Information icon.svgया लेखास/विभागास संबंधीत विषयाच्या जाणकारांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे..
    कृपया आपण स्वत: या लेखावर काम करा किंवा एखादा जाणकार निवडण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी चर्चा पान पहा.

    सावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर ह्या गावी झाला. त्यांचे वडील दामोदरपंत सावरकरांच्या तीन अपत्यांपैकी हे दुसरे होते. वि.दा. सावरकरांना बाबाराव हे मोठे आणि नारायणराव हे धाकटे भाऊ होते. सावरकरांची आई ते नऊ वर्षांचे असताना वारली. थोरल्या बंधूंच्या पत्नी येसूवहिनी यांनी त्यांचा सांभाळ केला. सावरकरांचे वडील इ.स. १८९९च्या प्लेगला बळी पडले.
    सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झाले. ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. वक्तृत्व, काव्यरचना ह्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. जिव्हा आणि लेखणी ते सारख्याच ताकदीने चालवत. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका, स्वतंत्रतेचे स्तोत्र ह्या रचना त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात. चाफेकरबंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजताच लहानग्या सावरकरांनी आपली कुलदेवता भगवती हिच्यापुढे "देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन" अशी शपथ घेतली.
    मार्च, इ.स. १९०१ मध्ये विनायकराव यमुनाबाई यांच्याशी विवाहबद्ध झाले. लग्नानंतर इ.स. १९०२ साली फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला व इ.स. १९०६ साली उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले.
    राष्ट्रभक्तसमूह ही गुप्त संघटना सावरकरानी पागे आणि म्हसकर ह्या आपल्या साथीदारांच्या साहाय्याने स्थापन केली. मित्रमेळा ही संघटना ह्या गुप्त संस्थेची प्रकट शाखा होती. ह्याच संघटनेचे पुढे अभिनव भारत ह्या संघटनेत रूपांतर झाले. इटालियन क्रांतिकारक आणि विचारवंत जोसेफ मॅझिनी ह्याच्या यंग इटली ह्या संस्थेच्या धर्तीवर हे नाव दिले गेले होते. सावरकरांनी पुण्यामध्ये इ.स. १९०५ साली विदेशी कापडाची होळी केली . श्यामजी कृष्ण वर्मा ह्यांनी ठेवलेली शिवाजी शिष्यवृत्ती मिळवून कायद्याच्या अभ्यासासाठी सावरकर लंडनला गेले. ही शिष्यवृत्ती त्यांना देण्यात यावी अशी सुचवण स्वतः लोकमान्य टिळकांनी केली होती. लंडनमधील इंडिया-हाऊसमध्ये राहात असताना सावरकरांनी जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचे मराठी भाषांतर केले. ह्या भाषांतराला जोडलेल्या प्रस्तावनेत सावकरांनी सशस्त्र क्रांतीचे तत्त्वज्ञान विषद केले होते. त्या काळातील अनेक युवकांना ही प्रस्तावना मुखोद्गत होती. लंडनमध्ये ‘इंडिया हाउस’ मध्ये अभिनव भारताचे क्रांतिपर्व सुरू झाले. मदनलाल धिंग्रा हा सावरकरांचा पहिला हुतात्मा शिष्य! मदनलालने कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याचा वध करून, हसत-हसत फाशी स्वीकारली. त्याच काळात त्यांनी इतर देशांमधील क्रांतिकारक गटांशी संपर्क करून त्यांच्याकडून बॉम्ब तयार करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले. ते तंत्रज्ञान व २२ ब्राऊनिंग पिस्तुले त्यांनी भारतात पाठवली. त्यापैकीच एका पिस्तुलाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध अनंत कान्हेरे या १६ वर्षाच्या युवकाने केला. या प्रकरणात अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे व विनायक देशपांडे या अभिनव भारताच्या ३ सदस्यांना फाशी झाली. कलेक्टर जॅक्सनचे जनतेवरील अन्याय वाढत होते, तसेच तो बाबाराव सावरकर (स्वातंत्र्यवीरांचे बंधू) यांच्या तुरुंगवासाला कारणीभूत ठरला होता, म्हणूनच क्रांतिकारकांनी जॅक्सनला यमसदनास पाठवले.
    इ.स. १८५७ मध्ये इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा साधार इतिहास सावरकरांनी लिहिला. 'अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्यसमर' हा तो ग्रंथ होय. हा उठाव म्हणजे केवळ एक बंड होय हा इंग्रज इतिहासकारांचा निष्कर्ष सावरकरांनी साधार खोडून काढला. ब्रिटिश शासनाने हा ग्रंथ प्रकाशनापूर्वीच जप्त केला. पण सावरकरांच्या साथीदारांनी तो इंग्लंडच्या बाहेरून प्रसिद्ध करण्यात यश मिळवले. ही ह्या ग्रंथाची इंग्रजी आवृत्ती होती. मूळ मराठी ग्रंथाचे हस्तलिखित सावरकरांचे मित्र कुटिन्हो ह्यांनी जपून ठेवले होते. ते भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रसिद्ध झाले.
    राजद्रोहपर लिखाण प्रसिद्ध केल्याचा आरोप ठेऊन सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर यांना ब्रिटिश शासनाने जन्मठेपेची शिक्षा देऊन काळ्या पाण्यावर धाडले. ह्या घटनेचा प्रतिशोध म्हणून लंडनमध्ये मदनलाल धिंग्रा ह्यांनी कर्झन वायलीला गोळ्या घातल्या तर नाशिक येथे अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन ह्याला गोळ्या घालून ठार केले. नाशिकच्या ह्या प्रकरणात वापरण्यात आलेली ब्राउनिंग जातीची पिस्तुले सावरकरांनी चतुर्भुज अमीन ह्याच्याकरवी धाडली होती. ब्रिटिश सरकारला याचा सुगावा लागताच त्यांनी सावरकरांना तात्काळ अटक केली. समुद्रमार्गाने त्यांना भारतात आणले जात असताना सावरकरांनी फ्रांन्सच्या मॉर्सेलिस बेटाजवळ बोटीतून उडी मारली(इ.स. १९१०). ब्रिटिशांच्या कैदेतून सुटून त्यांनी पोहत फ्रान्सचा समुद्रकिनारा गाठला. पण किनाऱ्यावरील फ्रेंच रक्षकांना भाषेच्या समस्येमुळे सावरकरांचे म्हणणे कळले नाही, आणि ब्रिटिश सैनिकांनी त्यांना अटक करून भारतात आणले. त्यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यांना दोन जन्मठेपांची-काळ्या पाण्याची-शिक्षा (सुमारे ५० वर्षे अंदमानच्या तुरुंगात) ठोठावण्यात आली (इ.स. १९११).मॉर्सेलिस येथे उडी मारताना सावरकरांनी सखोल विचार केला होता. दोन देशांतील कैदी हस्तांतरण किंवा अन्य तत्सम करारांचा मुद्दा त्यांच्या मनात होता. फ्रान्सच्या भूमीवरून (त्या शासनाच्या परवानगीशिवाय) ब्रिटिश पोलीस त्यांना पकडू शकणार नाहीत असा त्यांचा अंदाज होता. पण तसे घडले नाही.
    स्वातंत्र्यवीर सावरकरांचा तेजोभंग करण्यासाठी ब्रिटिश सरकारने त्यांना अंदमानच्या काळकोठडीत ठेवले. हरप्रकारे छळले. खड्या बेडीत टांगले. तेलाच्या घाण्याला जुंपले. नारळाचा काथ्या कुटण्याचे कष्टप्रत काम दिले. या मरणप्राय वेदना सहन करीत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होते, मातृभूचे स्वातंत्र्य! तब्बल ११ वर्षे हा छळ सहन करत असतानाही सावरकरांचे सर्जनशील कवित्व आणि बंडखोर क्रांतिकारकत्व तसूभरही कमी झाले नव्हते. बाभळीच्या काट्यांनी त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्ये लिहिली.
    अंदमानच्या काळकोठडीत सावरकरांना हिंदुस्थानचे बदलते राजकारण दिसत होते. ब्रिटिशांची बदललेली नीती, मुस्लीम लीगचा वाढता मुजोरपणा सावरकरांना अस्वस्थ करत होता. आज ब्रिटिश हे मुख्य शत्रू राहिलेले नाहीत. ते कधीतरी हा देश सोडून जाणारच आहेत. पण पुढे हिंदू संघटन करणे आवश्यक आहे हे सावरकरांनी ओळखले. विठ्ठलभाई पटेल, रंगस्वामी अय्यंगार यांसारख्या नेत्यांच्या प्रयत्नांमुळे व खुद्द सावरकरांनी मुत्सद्दीपणाने ब्रिटिश सरकारची काही बंधने मान्य केल्यामुळे त्यांची अंदमानातून सुटका झाली.
    अंदमानाहून सुटकेच्या आधीचे जीवन व सुटकेनंतरचे त्यांचे जीवन, असे सावरकरांच्या जीवनाचे दोन महत्त्वाचे भाग पडतात. पहिल्या भागात आक्रमक, क्रांतिकारी सावरकर, क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान सावरकर, धगधगते लेखन करणारे सावरकर - असे त्यांचे रूप दिसते. तर त्यांच्या जीवनाच्या दुसऱ्या भागात समाजक्रांतिकारक सावरकर, हिंदू संघटक सावरकर, भाषाशुद्धी चळवळ चालवणारे व श्रेष्ठ साहित्यिक सावरकर, समाजात प्रेरणा निर्माण करणारे वक्ते सावरकर, विज्ञाननिष्ठेचा प्रचार करणारे आणि हिंदू धर्म आधुनिक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करणारे तत्त्वज्ञ व विचारवंत सावरकर - अशा अनेक स्वरूपांत ते समाजासमोर आलेले दिसतात.

    सावरकरांचे जात्युच्छेदन[संपादन]

    Crystal Clear app clock.png
    हा/हे साचा /पान/लेख किंवा विभाग सध्या विस्तारला / बदलला /भाषांतरीत केला जात असण्याची शक्यता आहे.
    तरीही, आपण या प्रक्रियेस संपादन करून हातभार लावावा अशी या लेखावर काम करित असलेल्या सदस्यांची इच्छा आहे. जर आपणास हा संदेश कोणी लिहिला आहे हे जाणून घ्यायचे असल्यास कृपया या पानाचा इतिहास पहा.
    कृपया, हा साचा संपादने झाल्यानंतर काढून टाकणे होत असेल तरच लावावा, अन्यथा लावू नये. जर हे पान संपादन-अवस्थेत नसेल तर हा संदेश काढून टाकावा ही विनंती.

    अंदमानातून सुटल्यानंतर सावरकरांना ब्रिटिशांनी रत्‍नागिरीत स्थानबद्ध केले (१९२४ जाने.६[१]) . हिंदू समाज एकजीव आणि संघटित करण्यासाठी सावरकरांनी रत्‍नागिरीत राहून कार्य केले. हिंदू समाजाच्या अध:पतनाला जातिव्यवस्था, चातुर्वर्ण्य (१९३०नोव्हें )[२] जबाबदार आहे, हे सावरकरांनी लक्षात घेऊन त्या विरोधात काम केले. हिंदू धर्मात जातिव्यवस्थेचे, विषमतेचे समर्थन आहे. त्यामुळेच हिंदूसंघटन करण्यासाठी सावरकरांनी धर्मचिकित्सेची तलवार उपसली. आपल्या लेखनाने कोणी सनातनी दुखावेल याची चिंता न करता अंधश्रद्धा, जातिभेद यांवर त्यांनी कडाडून टीका केली. [३]स्वकीयांतील जातीयतेवरपण निर्भीड टीका केली.
    त्यांनी रत्नागिरीमधील वास्तव्यामध्ये अनेक समाजसुधारणा केल्या. जवळपास ५०० मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली. अनेक आंतरजातीय विवाह लावले. अनेक सहभोजने आयोजित केली. त्यांनंतर सर्वांसाठी 'पतित पावन मंदिर' सुरू केले व सर्वांसाठी सामाईक भोजनालयही सुरू केले. [४]
    जातिभेद तोडण्यासाठी सहभोजनाचा धडाका उडवून दिला. रत्‍नागिरी येथे त्यांनी पतितपावन मंदिर स्थापन केले, या मंदिरात सर्व जातींच्या लोकांना प्रवेश दिला. सुमारे १५ आंतरजातीय विवाहही त्यांनी लावून दिले. [५][६]

    एक माकड महासंमेलन आणि दुसरे भाकड महासंमेलन[संपादन]

    सावरकरांनी चालवलेल्या जात्युच्छेदन चलवळीने अस्वस्थ झालेल्या ब्राह्मणांनी लोणी येथे झालेल्या सनातनी परिषदेत सावरकरांना 'धर्मद्रोही' ठरवून 'त्यांना पेशवाई असती तर हत्तीच्या पायाखाली दिले गेले असते' असा ठराव मांडला.[७] [८] त्यावर ३००० ब्राह्मणांनी सह्या केल्या.[९] [१०]सावरकरांनी त्यावर 'शिवशाहीत अथवा, पहिल्या बाजीरावाच्या पेशवाईत आमच्यासारख्या हिंदू संघटकांना हत्तीच्या पाठीवरील अंबारीत मिरवले जाण्याचाच संभव अधिक होता' असे सडेतोड उत्तर दिले.मायबोली २००८च्या हितगुज दिवाळी अंकात डॉ. चिन्मय यांच्या मांडणीप्रमाणे, 'भटशाही' संपवण्यासाठी पूजा, पाठ, गौरी, गणपती, सोयरसुतक, संक्रांत, दिवाळी, दसरा, द्वादशी या धार्मिक कार्यक्रमांना भटांना बोलावणे बंद करून 'भटशाही' संपवावी असे मत मांडले. "त्यासोबतच काशीतील ब्राह्मण महासंमेलनाची तुलना त्यांनी माकडांशी केली. त्यात 'काशीत दोन महासंमेलने भरली - एक माकड महासंमेलन आणि दुसरे भाकड महासंमेलन. माकडे परिवर्तनीय तरी आहेत. पण सनातनी तर काळ, वेळ, परिस्थिती या गोष्टीच बघत नाहीत. अशा वागण्यामुळे निदान काशीच्या भाकड महासंमेलनातील पंडित हे तरी माकडांची विकसित श्रेणी नसून तेथील माकडेच त्या पंडितांची विकसित श्रेणी आहे हे म्हणणे क्रमप्राप्त आहे' असे लिहित त्यांची विकेट घेतली. [११]

    सात बेड्या[संपादन]

    सावरकरांनी अतिशय स्पष्ट शब्दात जातिव्यवस्थेवर हल्ला केला. अनुवंशात जातीचे मूळ आहे. त्या मुळावरच सावरकरांनी हल्ला चढवत अनुवंश हा आचरटपणा आहे, जर ब्राह्मणाच्या घरी 'ढ' जन्मला तर त्याला 'ढ'च म्हटले पाहिजे आणि जर शूद्रांत 'ज्ञ' निघाला तर त्याला 'ज्ञ'च म्हटले पाहिजे, मग त्याचा बाप, आजा अथवा पणजा 'ढ' असो की 'ज्ञ' असो. सावरकरांनी हल्ला करताना 'आपले हिंदुत्वाचे समर्थक दुखावतील' वगैरे फाजील भीती न बाळगता त्यांचे प्रबोधन केले. सावरकर म्हणतात की 'आज आमच्या हिंदू समाजात पोथीत तसे लिहिले आहे ते सोडून इतर कोणत्याही लक्षणाने सहज विभिन्नत्व विविध जातींमध्ये दिसून येत नाही. जात मानणे ही मूळ चूक! त्यात महादेवाच्या जटेपासून ही जात निघाली आणि ब्रह्मदेवाच्या बेंबीपासून अमुक जात निघाली इत्यादी उपरत्या अक्षरशः खऱ्या मानून त्या त्या जातींच्या अंगी ते ते गुण उपजतच आहेत हे मानणे ही घोडचूक!! अन् तो गुण त्या जातीच्या संतानात प्रकट झाला नसला तरी तो आहेच समजून तशी उच्च-नीचता त्या संतानास भोगावयास लावणे ही पहाड चूक. [१२]
    जातिव्यवस्था मोडण्यासाठी त्यांनी सात बेड्या मोडायला हव्यात हे सांगितले. त्या लेखात ते म्हणतात, पोथीजात जातिभेद हा मनाचा रोग आहे. मनाने तो मानला नाही की झटकन बरा होतो. त्यानंतर त्या सात बेड्या म्हणजे १)वेदोक्तबंदी {स्वतःच्या क्षत्रियादिक धर्मबंधूंनासुद्धा वेदोक्ताचा अधिकार नाही असे म्हणणारी भटबाजी यापुढे चालणार नाही.-सावरकर}२) व्यवसायबंदी ३) स्पर्शबंदी ४) सिंधूबंदी ५) शुद्धीबंदी ६) रोटीबंदी ७) बेटीबंदी. आपल्याकडे अजूनही बेटीबंदी मोठ्या प्रमाणात आहे. सावरकरांनी आंतरजातीय विवाहांना समर्थनच दिले नाही तर स्वतः आंतरजातीय विवाह लावले.[१३][१४]

    हिंदू महासभेचे कार्य[संपादन]

    रत्‍नागिरीत सावरकर सुमारे १३ वर्षे स्थानबद्धतेत होते. इ.स. १९३७ पासून सुमारे सात वर्षे, सावरकरांनी हिंदू महासभेचे अध्यक्षपद भूषविले. झंझावाती दौरे, मोठ्यामोठ्या सभा, हिंदूंची सैन्यभरती, रॉयल क्लब्सची स्थापना अशा अनेक मार्गांनी त्यांनी हिंदू महासभेचे कार्य केले. त्यांनी आधुनिक विचारधारेप्रमाणे बुद्धिवाद व विज्ञाननिष्ठा यांची कास धरून हिंदू धर्मात सुधारणा करण्यासाठी लढा दिला.
    एक क्रांतिकारक, ज्वलंत साहित्यिक (महाकवी), समाजसुधारक, हिंदू संघटक या पैलूंसह स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारतीय समाज ढवळून काढला, स्वातंत्र्यलढ्यात अभूतपूर्व योगदान दिले. फाळणीला व तत्कालीन काँग्रेसच्या धोरणांना त्यांनी प्रखर विरोध केला. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी सीमांची सुरक्षा, सैनिकांची संख्या वाढवणे, शस्त्रसज्जता अशा अनेक विषयांचा आग्रह त्यांनी धरला.
    सुमारे ६० वर्षे त्यांनी स्वातंत्र्य व सुराज्य यांसाठी अथक परिश्रम घेतले. इ.स. १९६६ मध्ये वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी प्रायोपवेशनाचा निर्णय घेतला.१ फेब्रुवारी १९६६ रोजी त्यांनी अन्न ,पाणी आणि औषधाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. अन्नत्याग केल्यानंतर २६ फेब्रुवारी १९६६ रोजी त्यांचे प्राण पंचतत्त्वात विलीन झाले.

    संस्था[संपादन]

    सावरकरांचे नाव असलेल्या अनेक संस्था भारतात आहेत. त्यांतील काही संस्थांची ही नावे :-
    • वीर सावरकर फाउंडेशन (कलकता)
    • वीर सावरकर मित्र मंडळ ()
    • वीर सावरकर स्मृती केंद्र (बडोदा)
    • समग्र सावरकर वाङ्मय प्रकाशन समिती
    • सावरकर दर्शन प्रतिष्ठान (मुंबई)
    • सावरकर रुग्ण सेवा मंडळ (लातूर)
    • स्वातंत्र्यवीर सावरकर गणेश मंडळ ()
    • स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ (निगडी-पुणे जिल्हा)
    • स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ (डोंबिवली-ठाणे जिल्हा)
    • स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ (मुंबई). ही संस्था सावरकर साहित्य संमेलने भरविते.

    सावरकर साहित्य[संपादन]

    स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व त्यांच्या भाषाशैलीत प्रतिबिंबित झाले आहे. कवी, निबंधकार, जीवनदर्शन घडविणारा नाटककार, राजकीय व सामाजिक पार्श्वभूमीवर आधारित कादंबऱ्यांचा लेखक,ग्रंथकार, इतिहासकार, भाषाशास्त्रज्ञ ही साहित्यिक सावरकरांची अनेकविध रूपे आहेत.
    सावरकरांचे पहिले काव्य म्हणजे वयाच्या अकराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका. सावरकरांनी त्यांच्या कविता महाविद्यालयात, लंडनच्या वास्तव्यात, अंदमानच्या काळकोठडीत आणि रत्‍नागिरीत रचल्या. कोठडीच्या भिंतींवर काट्याकुट्यांनी महाकाव्य लिहिणारा हा जगातील एकमेव महाकवी. शब्दलालित्य, भावोत्कटता, विलक्षण मार्दव व माधुर्य ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. सुस्पष्ट विचार, तर्कसंगत मांडणी आणि विचारांच्या अभिव्यक्तीचे सामर्थ्य ही त्यांच्या निबंधांची बलस्थाने आहेत.
    सावरकरांनी अंदमानच्या तुरुंगात असताना काही उर्दू गझला लिहिल्या होत्या; त्या जुलै २०१३मध्ये सापडल्या. नंतर त्या गझला अमिताभ बच्चन यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झाल्या. सावरकरांच्या गझला, काही हिंदी कविता आणि आणि मराठीतून हिंदीत भाषांतरित केलेल्या सावरकरांच्या काही रचना यांची एक सीडी निघाली आहे. सीडीतील कविता जावेद अली, जसविंदर नरुला, स्वप्नील बांदोडकर, शंकर महादेवन, सुरेश वाडकर, साधना सरगम आणि [[वैशाली सामंत][] यांनी गायल्या आहेत.
    सावरकर हे इतिहास घडविणारे इतिहासकार होते. त्यांचा शिखांचा इतिहास अप्रकाशित राहिला. सावरकरांनी विचारप्रवर्तनाबरोबरच भाषाशुद्धीचे प्रत्यक्ष कार्य केले. क्रमांक, चित्रपट, बोलपट, नेपथ्य, वेशभूषा, दिग्दर्शक, प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शस्त्रसंधी, कीलक राष्ट, टपाल, दूरध्वनी, नभोवाणी, ध्वनिक्षेपक, अर्थसंकल्प, विधिमंडळ, परीक्षक, तारण, संचलन, गतिमान नेतृत्व, क्रीडांगण, सेवानिवृत्तीवेतन, महापौर, हुतात्मा, उपस्थित असे शतावधी समर्पक शब्द सावरकरांनी सुचविलेले आहेत.
    वि.दा. सावरकर हे मुंबई येथे १९३८ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

    पुरस्कार[संपादन]

    स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या नावाने अनेक पुरस्कार दिले जातात. उदा०
    • ’निनाद’तर्फे दिला जाणारा स्वातंत्र्यवीर सावरकर ध्येयवादी पुरस्कार
    • दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने दरवर्षी दिले जाणारे *स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय पुरस्कार, विज्ञान पुरस्कार, समाजसेवा पुरस्कार आणि शौर्य पुरस्कार
    • वीर सावरकर फाउंडेशनचा वीर सावरकर पुरस्कार
    • टिळकनगर (डोंबिवली) शिक्षण प्रसारक मंडळाच्या सावरकर अभ्यास मंडळाचे वीर सावरकर सेवा पुरस्कार

    ग्रंथ आणि पुस्तके[संपादन]

    वीर सावरकरांनी १०,००० पेक्षा जास्त पाने मराठी भाषेत तर १५०० हून जास्त पाने इंग्रजी भाषेत लिहिली आहेत. फारच थोड्या मराठी लेखकांनी इतके मौलिक लिखाण केले असेल. त्यांच्या "सागरा प्राण तळमळला", "हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा", "जयोस्तुते", "तानाजीचा पोवाडा" ह्या कविता प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यांच्याच कमला या काव्यसंग्रहातील खालील ओळी त्यांचा कडवा राष्ट्रवाद दर्शवितात -
    अनेक फुले फुलती फुलोनिया सुकून जाती
    त्याची महती गणती कोणी ठेवली असेल का?
    परी गजेंद्र शुंडे उपटीले, श्रीहरिसाठी नेले,
    फूल ते अमर ठेले मोक्षदाते पावन.
    अमर ती वंशवेला निर्वंश जिचा देशाकरिता,
    दिगंती पसरेल सुगंधिता, लोकहीत परिमलाची.

    इतिहास[संपादन]

    • १८५७ चे स्वातंत्र्यसमर या ग्रंथाद्वारे, (इ.स. १८५७च्या युद्धाचा पहिले स्वातंत्र्यसमर असा उल्लेख करून तो लढा त्यांनी पहिल्यांदा भारतीय स्वातंत्र्यलढ्यास]ला जोडला)
    • भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने
    • हिंदुपदपादशाही

    कथा[संपादन]

    • सावरकरांच्या गोष्टी भाग - १
    • सावरकरांच्या गोष्टी भाग - २

    कादंबरी[संपादन]

    • काळेपाणी
    • मोपल्यांचे बंड अर्थात्‌ मला काय त्याचे -मल्हार प्रॉडक्शन्सने या कादंबरीची ऑडियो आवृत्ती काढली आहे.

    आत्मचरित्रपर[संपादन]

    • माझी जन्मठेप
    • शत्रूच्या शिबिरात
    • अथांग (आत्मचरित्र पूर्वपीठिका)

    हिंदुत्ववाद[संपादन]

    • हिंदुत्व
    • हिंदुराष्ट्र दर्शन
    • हिंदुत्वाचे पंचप्राण

    लेखसंग्रह[संपादन]

    • मॅझिनीच्या आत्मचरित्राची प्रस्तावना - अनुवादित
    • गांधी गोंधळ
    • लंडनची बातमीपत्रे
    • गरमागरम चिवडा
    • तेजस्वी तारे
    • जात्युच्छेदक निबंध
    • विज्ञाननिष्ठ निबंध
    • स्फुट लेख
    • सावरकरांची राजकीय भाषणे
    • सावरकरांची सामाजिक भाषणे

    नाटके[संपादन]

    • संगीत उ:शाप
    • संगीत संन्यस्त खड्‌ग
    • संगीत उत्तरक्रिया
    • बोधिसत्व- (अपूर्ण)
    117.199.55.245 ०७:४५, ६ एप्रिल २०१४ (IST)dipak=== कविता === महाकाव्ये
    • कमला
    • गोमांतक
    • विरहोच्छ्वास
    • सप्तर्षी
    स्फुट काव्य
    • सावरकरांच्या कविता

    स्वातंत्र्यवीर सावरकरांवर लिहिलेली पुस्तके आणि त्याचे प्रकाशक[संपादन]

    चरित्रग्रंथ
    • अत्रे, प्रभाकर १९८५. वसा वादळाचा | स्नेहल प्रकाशन, पुणे
    • अंदूरकर, व्यं.गो. १९७०. शत्रूच्या गोटात सावरकर । सुरस ग्रंथमाला, सोलापूर
    • अधिकारी, गोपाळ गोविंद १९३७. बॅ. सावरकर यांचे चरित्र | महाराष्ट्र प्रकाशन संस्था, मुंबई
    • आचार्य अत्रे, मालशे, स.गं.(संपादक) १९८३. क्रांतिकारकांचे कुलपुरुष सावरकर | परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई
    • आठवले, रा.म. १९३८. बॅ. विनायक दामोदर सावरकर
    • आफळे, गोविंदस्वामी (लेखक व प्रकाशक) १९६७. सावरकर गाथा
    • उपाध्ये, संजय २००२. विनायक विजय . चंद्रकला प्रकाशन, पुणे
    • करंदीकर, शि.ल. १९६६. असे होते वीर सावरकर । सीताबाई करंदीकर, पुणे
    • करंदीकर, सीताबाई १९४३. सावरकर-चरित्र (कथन) | सीताबाई करंदीकर, पुणे
    • --?--१९४७. सावरकरांचे सहकारी | गं.पा. परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई
    • कर्‍हाडे, शंकर १९८३. गोष्टीरूप सावरकर , विजय प्रकाशन, नागपूर
    • किर्लोस्कर, मुकुंदराव (संपादक) १९८६. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या तेजस्वी जीवनावरील अलौकिक विशेषांक | सावरकर दर्शन प्रतिष्ठान, पुणे
    • कीर, धनंजय १९५०. सावरकर अॅन्ड हिज टाइम्स
    • कुळकर्णी, श्यामकांत २०००. गाथा थोर क्रांतीभास्कराची, विजय प्रकाशन, नागपूर
    • केळकर, भा.कृ. १९५२. सावरकर-दर्शन व्यक्ति नि विचार, गं.पा. परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई
    • खाडिलकर, नीळकंठ १९८६. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि प्रॅक्टिकल सोशॅलिझम, दैनिक नवाकाळ प्रकाशन, मुंबई
    • खांबेटे, द.पां.(अनुवाद), १९७२. स्वातंत्र्यवीर सावरकर, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई
    • गद्रे, अनुराधा अ. २००५. स्वातंत्र्यवीर सावरकर, मनोरमा प्रकाशन, मुंबई
    • गोखले, द.न. १९८९. स्वातंत्र्यवीर सावरकर: एक रहस्य, मौज प्रकाशन गृह, मुंबई
    • गोखले, मो.शी. १९४०. वीर सावरकर
    • गोखले, विद्याधर २००५. झंझावात, मनोरमा प्रकाशन, मुंबई
    • गोखले, श्री.पु. १९६९. अशी गर्जली वीरवाणी , लोकमान्य प्रकाशन, पुणे
    • --?--१९८३. सावरकरांशी सुखसंवाद, मॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई
    • गोडसे, गोपाळ १९६९. जय मृत्युंजय (स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावरील कविता), केसरी प्रकाशन, पुणे
    • गोडबोले, अ.मा. १९९७. क्रांतदर्शी सावरकर, साहित्यसेवा प्रकाशन, औरंगाबाद
    • गोविंदमित्र १९५७. स्वातंत्र्यवीर श्री. विनायक दामोदर सावरकर यांचे काव्यमय चरित्र | गं.वि.परचुरे, कल्याण
    • घाणेकर, ऋचा २००३. स्वातंत्र्यवीर सावरकर, महाजन ब्रदर्स, पुणे
    • जोगळेकर, ज.द. १९८३. स्वातंत्र्यवीर सावरकर वादळी जीवन | उत्कर्ष प्रकाशन, पुणे
    • जोगळेकर, ज.द. १९८३. पुनरुत्थान | पंडित बखले, मुंबई
    • जोशी, विष्णू श्रीधर १९८५. क्रांतिकल्लोळ | मनोरमा प्रकाशन, मुंबई
    • --?--१९९२. अखेर उजाडलं, पण देश रक्तबंबाळ । मनोरमा प्रकाशन, मुंबई
    • --?--१९९२, झुंज सावरकरांची । मनोरमा प्रकाशन, मुंबई
    • ताटके, अरविंद १९७३. युगप्रवर्तक सावरकर । स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, मुंबई
    • दुगल, न.दि. १९८३. देशप्रेमा... तुझे नाव सावरकर । अजब पुस्तकालय, कोल्हापूर
    • देशपांडे, बालशंकर १९५८. क्रांतिकारकांचे मुकुटमणि स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर
    • देशपांडे, भास्कर गंगाधर १९७४. क्रांतिसूर्य सावरकर, अजय प्रकाशन, औरंगाबाद
    • देसाई, हरिश्चंद्र त्र्यंबक १९८३. शतपैलू सावरकर । प्रबोधन, मुंबई
    • नातू, र.वि. १९९७. समग्र सावरकर खंड १० , पृष्ठे ६००० ची संदर्भसूची, वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
    • पेठे, मंगला कृ. १९८४. सावरकर गौरव गान
    • फडके, य.दि. १९८४. शोध सावरकरांचा , श्रीविद्या प्रकाशन, पुणे
    • बखले पंडित (संपादक) १९६०. मृत्युंजय सावरकर
    • बर्वे, शंकर नारायण १९४७. स्वातंत्र्यवीर (बॅ.सावरकर यांच्या चरित्रातील काही पद्यमय प्रसंग), विष्णू सि. चितळे, पुणे
    • बोडस, आनंद ज. २००७. सावरकरांची तिसरी जन्मठेप , मनोरमा प्रकाशन, मुंबई
    • भट, रा.स. १९७२. सावरकरांचे जीवनदर्शन , वोरा अॅन्ड कंपनी पब्लिशर्स प्रा. लि., मुंबई
    • भागवत, अ.गो. (अनुवाद) १९४७. बॅरिस्टर सावरकर चरित्र अ.गो. भागवत, बडोदा
    • भालेराव, सुधाकर सोवनी १९८४. स्वातंत्र्यवीर सावरकर विचारमंथन , प्रमोद प्रकाशन, नागपूर
    • भावे, पु.भा. १९८२. सावरकर नावाची ज्योत , सन पब्लिकेशन्स, पुणे
    • भिडे, ग.र. १९४२. सावरकरांची सूत्रे , कोल्हापूर
    • भिडे, गोविंद १९७३. सागरा प्राण तळमळलाः स्वातंत्र्यवीर सावरकरांचे शब्दरूप
    • --?-- (वर्ष?). जीवनदर्शन । जोशी ब्रदर्स बुकसेलर्स अॅन्ड पब्लिशर्स, पुणे
    • भोपे, रघुनाथ गणेश १९३८. स्वातंत्र्यवीर बॅ.विनायक दामोदर सावरकर यांचे जीवनचरित्र । भोपे प्रकाशन, अहमदनगर
    • मेहरूणकर, प्रभाकर १९९३. तेजोनिधी सावरकर । मोरया प्रकाशन, डोंबिवली
    • रानडे, सदाशिव राजाराम १९२४. स्वातंत्र्यवीर विनायकराव सावरकर ह्यांचे संक्षिप्त चरित्र । लोकमान्य छापखाना, मुंबई
    • रायकर, गजानन १९६६. महापुरुष स्वातंत्र्यवीर सावरकर चरित्र
    • वर्तक, श्रीधर रघुनाथ १९७०. क्रांतदर्शी सावरकर , संग्राहक काळ, प्रकाशन, पुणे
    • वर्‍हाडपांडे, व.कृ. (संपादक), १९८३. गरुडझेप (सावरकर गौरवग्रंथ) , विजय प्रकाशन, नागपूर
    • वाळिंबे, वि.स. १९६७. स्वातंत्र्यवीर सावरकर , केसरी प्रकाशन, पुणे
    • --?--१९८३. सावरकर , मॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई
    • शिंदे, वि.म. १९९९. आठवणींची बकुळ फुले | नवचैतन्य प्रकाशन, मुंबई
    • शिदोरे, प्रभाकर गोविंद १९८४. स्वातंत्र्यवीर सावरकर , न.पा. साने, मुंबई
    • साटम, दौलत मुरारी १९७०. स्वातंत्र्यवीर विनायकराव सावरकर , साटम प्रकाशन, मुंबई
    • सावरकर, बाळाराव (संकलक) १९६९. वीर सावरकर आणि गांधीजी | वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
    • --?--१९७२. हिंदुसमाज संरक्षक स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर (रत्नागिरी पर्व) | वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
    • --?--१९७५. स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदु महासभापर्व भाग-१ (जून १९३७ ते डिसेंबर १९४०) । वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
    • --?--१९७६. स्वातंत्र्यवीर सावरकर अखंड हिंदुस्थान लढा पर्व
    • --?--१९९७. योगी योद्धा वि.दा.सावरकर । वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
    • --?--(जानेवारी १९४१ ते १५ ऑगस्ट १९४७) वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
    • सावरकर, विश्वास विनायक १९८६. आठवणी अंगाराच्या (स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आठवणी) । स्नेहल प्रकाशन, पुणे
    • सावरकर, शां.शि. १९९२. अथांग (श्री. वि.दा. सावरकर आत्मचरित्र प्रारंभ) | ?,मुंबई
    • सोनपाटकी, मुकुंद १९८०. दर्यापार | पुरंदरे प्रकाशन, पुणे
    • सोवनी, म.वि. १९६७. मृत्युंजय सावरकरः चित्रमय चरित्र | चित्रसाधन प्रकाशन, पुणे
    • हर्षे, द.स. १९६६. सावरकर-दर्शन | द.स. हर्षे प्रकाशन, सातारा
    • क्षीरसागर, प्रकाश १९८९. तेजोमय दाहक ते । स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर,
    • श्रीवास्तव, हरीन्द्र, खोत, अनुराधा (अनुवाद) १९९६. एक झंझावात-शत्रूच्या शिबिरात । सावरकर स्मृती केंद्र, बडोदे
    • --?--१९५७. आत्मवृत्त । व्हीनस प्रकाशन, पुणे
    • --?--१९५८. सावरकर विविध दर्शन । व्हीनस प्रकाशन, पुणे
    • १९६२, सावरकर यांच्या आठवणी । अधिकारी प्रकाशन, पुणे
    • १९६९, महायोगी वीर सावरकर , वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
    • १९७३, सावरकर आत्मचरित्र (पूर्वपीठिका) ।, मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई
    • १९७२, सावरकर आत्मचरित्र (भगूर) | मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई
    • १९७८, स्वातंत्र्यवीर सावरकर विषयक वक्ते नि लेखक यांची सूची | स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, मुंबई
    • वीर सावरकर जयंती निबंध स्पर्धेतील चार यशस्वी निबंध । अखंड हिंदुस्थान प्रकाशन, मुंबई

    अधिक वाचन[संपादन]

    • ज्वालामुखीचे अग्निनृत्य - वि. श्री. जोशी
    • शोध सावरकरांचा - य. दि. फडके
    • क्रांतिकारकांचे कुलपुरुष - आचार्य अत्रे
    • सावरकरांचे समाजकार्य सत्य आणि विपर्यास - शेषराव मोरे
    • सावरकरांचा बुद्धिवाद एक चिकित्सक अभ्यास - शेषराव मोरे
    • रत्नागिरी पर्व - आचार्य बाळाराव सावरकर
    • हिंदुसभा पर्व खंड १ - आचार्य बाळाराव सावरकर
    • हिंदुसभा पर्व खंड २ - आचार्य बाळाराव सावरकर
    • सांगता पर्व - आचार्य बाळाराव सावरकर
    • सावरकर चरित्र - धनंजय कीर
    • सावरकर नावाची ज्योत - पु.भा.भावे
    • सावरकर चरित्र - शि.ल.करंदीकर
    • दर्यापार - मुकुंद सोनपाटकी

    वीर सावरकर

    हेही पहा[संपादन]

    • स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व संमेलन : सावरकर साहित्य संमेलन : सावरकर साहित्य अभ्यास मंडळ

    संदर्भ[संपादन]

    1. वर उडी मारा↑ http://www.savarkarsmarak.com/chronology_m.php
    2. वर उडी मारा↑ http://www.savarkar.org/mr/समाजसुधारणा/जात्युच्छेदक-निबंध + http://www.savarkarsmarak.com/chronology_m.php
    3. वर उडी मारा↑ http://www.savarkar.org/mr/समाजसुधारणा/जात्युच्छेदक-निबंध वेबसाईट दिनांक २६ जुलै २०१२ १४-३५ वाजता पाहिले
    4. वर उडी मारा↑ http://vishesh.maayboli.com/node/55 मायबोली हितगुज दिवाळी अंक २००८ जात्युच्छेदन आणि हिंदुत्व : सावरकर, संघ आणि शिवसेना. -लेखक चिन्या १९८५( डॉ.चिन्मय कुलकर्णी) ही वेबसाईट २६ जुलै २०१२ रोजी जशी पाहिली
    5. वर उडी मारा↑ http://vishesh.maayboli.com/node/55 मायबोली हितगुज दिवाळी अंक २००८ जात्युच्छेदन आणि हिंदुत्व : सावरकर, संघ आणि शिवसेना. -लेखक चिन्या १९८५( डॉ.चिन्मय कुलकर्णी) ही वेबसाईट २६ जुलै २०१२ रोजी जशी पाहिली
    6. वर उडी मारा↑ http://divyamarathi.bhaskar.com/article/EDT-freedam-fighter-sawarkar-social-change-program-3330764.html
    7. वर उडी मारा↑ महाराष्ट्रीय मानसिकता आणि सुवर्णमहोत्सव-दत्तप्रसाद दाभोलकर, शुक्रवार, २१ मे २०१० दैनिक लोकसत्तातील लेख[मृत दुवा] दिनांक २८/७/२०१२ रोजी जसा पाहिला
    8. वर उडी मारा↑ http://vishesh.maayboli.com/node/55 मायबोली हितगुज दिवाळी अंक २००८ जात्युच्छेदन आणि हिंदुत्व : सावरकर, संघ आणि शिवसेना. -लेखक चिन्या १९८५ ( डॉ.चिन्मय कुलकर्णी) ही वेबसाईट २६ जुलै २०१२ रोजी जशी पाहिली
    9. वर उडी मारा↑ http://vishesh.maayboli.com/node/55 मायबोली हितगुज दिवाळी अंक २००८ जात्युच्छेदन आणि हिंदुत्व : सावरकर, संघ आणि शिवसेना. -लेखक चिन्या १९८५ ( डॉ.चिन्मय कुलकर्णी) ही वेबसाईट २६ जुलै २०१२ रोजी जशी पाहिली
    10. वर उडी मारा↑ http://raigad.wordpress.com/स्वातंत्र्यवीर-सावरकर-का/जर-आज-पेशवाई-असती-तर/ “सावरकर एक अभिनव दर्शन” या पुस्तकातील लेखावरून घेतल्याचा उल्लेख वेबसाईट २९/७/२०१२ला जशी पाहिली
    11. वर उडी मारा↑ http://vishesh.maayboli.com/node/55 मायबोली हितगुज दिवाळी अंक २००८ जात्युच्छेदन आणि हिंदुत्व : सावरकर, संघ आणि शिवसेना. -लेखक चिन्या १९८५ ( डॉ.चिन्मय कुलकर्णी) ही वेबसाईट २६ जुलै २०१२ रोजी जशी पाहिली
    12. वर उडी मारा↑ http://vishesh.maayboli.com/node/55 मायबोली हितगुज दिवाळी अंक २००८ जात्युच्छेदन आणि हिंदुत्व : सावरकर, संघ आणि शिवसेना. -लेखक चिन्य १९८५ ही वेबसाईट २६ जुलै २०१२ रोजी जशी पाहिली
    13. वर उडी मारा↑ http://vishesh.maayboli.com/node/55 मायबोली हितगुज दिवाळी अंक २००८ जात्युच्छेदन आणि हिंदुत्व : सावरकर, संघ आणि शिवसेना. -लेखक चिन्या १९८५ ही वेबसाईट २६ जुलै २०१२ रोजी जशी पाहिली
    14. वर उडी मारा↑ [http://www.savarkarsmarak.com/activityimages/Jatyucchedak%20Nibandha%20-II.pdf जात्युच्छेदक निबंध भाग दोन सावरकरस्मारक डॉट कॉम वेबसाईट २९/०७/२०१२ रात्री दहा वाजता पाहिल्याप्रमाणे

    बाह्य दुवे[संपादन]

    • सावरकर.ऑर्ग
    • कामत.कॉम - सावरकरांचे चरित्र
    • हू वॉज वीर सावरकर? - रिडिफ संकेतस्थळावरील लेख (प्रश्नोत्तर स्वरूपात)
    • द मास्टरमाइंड? - आउटलुक या साप्ताहिकाचा लेख. या लेखात गांधीहत्येच्या कटाचे
    • Official Website of Savarkar National Memorial
    • A website dedicated to Savarkar
    • Satyashodh.com facts
    • Newsreel on Savarkar
    [दाखवा]
    प • च • सं
    भारताचा स्वातंत्र्यलढा

    [लपवा]
    प • च • सं
    मराठी संगीत रंगभूमी
    नाट्यसंस्था
    आर्योद्धारक नाटक मंडळी · इचलकरंजी नाटकमंडळी · किर्लोस्कर संगीत मंडळी · कोल्हापूरकर नाटकमंडळी · गंधर्व संगीत मंडळी · तासगावकर नाटकमंडळी · नाट्यमन्वंतर · पुणेकर नाटकमंडळी · बलवंत संगीत मंडळी · रंगशारदा · ललितकलादर्श · सांगलीकर नाटकमंडळी  ·
    संगीत नाटककार आणि पद्यरचनाकार
    अण्णासाहेब किर्लोस्कर  · आप्पा टिपणीस · काकासाहेब खाडिलकर · गोविंद बल्लाळ देवल  · तात्यासाहेब केळकर · नागेश जोशी · पुरुषोत्तम दारव्हेकर · प्रल्हाद केशव अत्रे · बाळ कोल्हटकर · भार्गवराम विठ्ठल वरेरकर · माधवराव जोशी · माधवराव पाटणकर · मोतीराम गजानन रांगणेकर · राम गणेश गडकरी  ·वसंत शंकर कानेटकर · वसंत शांताराम देसाई · विद्याधर गोखले · विश्राम बेडेकर · वीर वामनराव जोशी · शांता शेळके · श्रीपाद कृष्ण कोल्हटकर  · ह. ना. आपटे ·  ·
    संगीत नाटके
    संगीत अमृत झाले जहराचे · अमृतसिद्धी · आंधळ्यांची शाळा · आशानिराशा · संगीत आशीर्वाद · संगीत उत्तरक्रिया · संगीत उ:शाप · संगीत एकच प्याला · संगीत एक होता म्हातारा · संगीत कट्यार काळजात घुसली · संत कान्होपात्रा · संगीत कुलवधू · संगीत कोणे एके काळी · घनःश्याम नयनी आला ·संगीत चमकला ध्रुवाचा तारा · संगीत जय जय गौरीशंकर · दुरितांचे तिमिर जावो · देव दीनाघरी धावला · धाडिला राम तिने का वनी? · नंदकुमार · संगीत पंडितराज जगन्नाथ · पुण्यप्रभाव · प्रेमसंन्यास · संगीत भावबंधन · भूमिकन्या सीता · संगीत मत्स्यगंधा · संगीत मदनाची मंजिरी · संगीत मंदारमाला ·संगीत मानापमान · संगीत मूकनायक  · संगीत मृच्छकटिक  · संगीत मेघमल्हार · मेनका · संगीत ययाति आणि देवयानी · राजसंन्यास · लेकुरे उदंड जाहली · संगीत वहिनी · वासवदत्ता · वाहतो ही दुर्वांची जुडी · संगीत विद्याहरण · विधिलिखित · वीज म्हणाली धरतीला · वीरतनय · संगीत शाकुंतल ·शापसंभ्रम · संगीत शारदा  · श्रीलक्ष्मी-नारायण कल्याण · संगीत संन्यस्त खड्‌ग · संगीत संशयकल्लोळ · सावित्री · सीतास्वयंवर · संगीत सुवर्णतुला · संगीत स्वयंवर  · संगीत स्वरसम्राज्ञी · हे बंध रेशमाचे ·  ·  ·
    संगीतनट
    अजित कडकडे  · अनंत दामले  · उदयराज गोडबोले · कान्होपात्रा किणीकर  · कीर्ती शिलेदार  · केशवराव भोसले  · गणपतराव बोडस  · छोटागंधर्व · जयमाला शिलेदार  · जयश्री शेजवाडकर · जितेंद्र अभिषेकी · मास्टर दीनानाथ  · नारायण श्रीपाद राजहंस  · नीलाक्षी जोशी · प्रकाश घांग्रेकर  · प्रभा अत्रे · फैयाज  ·भाऊराव कोल्हटकर · मास्तर भार्गवराम · मधुवंती दांडेकर · मीनाक्षी · रजनी जोशी · रामदास कामत · राम मराठे · वसंतराव देशपांडे  · वामनराव सडोलीकर  · विश्वनाथ बागुल  · शरद गोखले  · श्रीपाद नेवरेकर · सुरेशबाबू हळदणकर · सुहासिनी मुळगांवकर  ·  ·
    [दाखवा]
    प • च • सं
    मराठी कवी
    वर्ग: 
       
    • Pages using duplicate arguments in template calls
    •  
    • जाणकार
    •  
    • काम चालू
    •  
    • इ.स. १८८३ मधील जन्म
    •  
    • इ.स. १९६६ मधील मृत्यू
    •  
    • अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष
    •  
    • भारतीय स्वातंत्र्यसैनिक
    •  
    • मराठी कवी
    •  
    • मराठी लेखक
    •  
    • विनायक दामोदर सावरकर
    •  
    • पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती
    •  
    • इतिहासकार
  1. विनायक दामोदर सावरकर - विकिपीडिया

    mr.wikipedia.org/wiki/विनायक_दामोदर_सावरकर
     
    Vinayak damodar savarkar.jpg. जन्म: मे २८, इ.स. १८८३ · भगूर, नाशिक जिल्हा, महाराष्ट्र, भारत. मृत्यू: फेब्रुवारी २६, इ.स. १९६६
  2. Vinayak Damodar Savarkar - Wikipedia, the free encyclopedia

    en.wikipedia.org/.../Vinayak_Damodar...
     
     या पानाचे भाषांतर करा
    Savarkar. Permanent Court of Arbitration - Cour permanente d'arbitrage.svg ..... Sitting: Narayan Apte, Vinayak D. Savarkar, Nathuram Godse, Vishnu Karkare.
    ‎Prayopavesa - ‎Sallekhana - ‎Madan Lal Dhingra - ‎Ganesh Damodar Savarkar

  3. vinayak d savarkar साठी प्रतिमाप्रतिमांची तक्रार नोंदवा
    • vinayak d savarkar साठी प्रतिमा परिणाम
    •  
    • vinayak d savarkar साठी प्रतिमा परिणाम
    •  
    • vinayak d savarkar साठी प्रतिमा परिणाम
    •  
    • vinayak d savarkar साठी प्रतिमा परिणाम
    •  
    • vinayak d savarkar साठी प्रतिमा परिणाम
    •  
    • vinayak d savarkar साठी प्रतिमा परिणाम
    •  
    • vinayak d savarkar साठी प्रतिमा परिणाम
    vinayak d savarkar साठी अधिक प्रतिमा

  4. Kamat's Potpourri: Biography of Vinayak Damodar Savarkar

    www.kamat.com › ... › Biographies
     
     या पानाचे भाषांतर करा
    ४ एप्रि, २०१४ - Vinayak D. Savarkar (1883-1966) Scholar, Leader, Mahä-Patriot Veer Savarkar, as he is known among his followers, urged to build a militarily ...
  5. Veer Savarkar | Vinayak Damodar Savarkar

    www.savarkar.org/en/veer-savarkar
     
     या पानाचे भाषांतर करा
    Vinayak Damodar Savarkar, commonly known as Swatantryaveer Savarkar was a fearless freedom fighter, social reformer, writer, dramatist, poet, historian, ...
  6. Mahatma Gandhi Murder Case | विनायक दामोदर सावरकर

    www.savarkar.org › Biography
     
    In the Final Order, the Special Court pronounced “ VINAYAK D. SAVARKAR- He is not guilty of the offences as specified in the charge, and is acquitted ...
  7. Veer Savarkar Biography - iloveIndia.com

    www.iloveindia.com › ... › Leaders
     
     या पानाचे भाषांतर करा
    ... Savarkar. Read information on life of Indian freedom fighter Veer Savarkar. ... VeerSavarkar's original name was Vinayak Damodar Savarkar. He was born on ...
  8. Vinayak Damodar Savarkar - India

    india.wikia.com/.../Vinayak_Damodar_...
     
     या पानाचे भाषांतर करा
    Vinayak Damodar Savarkar. Vināyak Dāmodar Sāvarkar (Marathi: विनायक दामोदर सावरकर) (May 28, 1883 – February 26, 1966) was an Indian political ...
  9. Savarkar and Gandhi's murder - Frontline

    www.frontline.in/.../201210052919114...
     
     या पानाचे भाषांतर करा
    ५ ऑक्टो, २०१२ - Now I take up the approver's evidence that does not stand corroborated in regard to the identity of a certain accused—Vinayak D. Savarkar.
  10. Vinayak Damodar Savarkar - YouTube

    vinayak d savarkar साठी व्हिडिओ▶ 90:39
    www.youtube.com/watch?v=_nJMX0OIwyU
     
    ६ नोव्हें, २०१२ - karna digital media द्वारा अपलोड केलेले
    " Vinayak Damodar Savarkar " a marathi speach on life ofVinayak Damodar Savarkar Courtesy eprasaran ...

12345678910पुढील
Unknown at 04:08
Share

No comments:

Post a Comment

‹
›
Home
View web version

About Me

Unknown
View my complete profile
Powered by Blogger.